Breaking News

'बजरंगी भाईजान'चे नाव चीनमध्ये बदलणार.

चीनमध्ये आता सलमान खानदेखील आपला चित्रपट बजरंगी भाईजानबरोबर दाखल होणार आहे व तेथे या चित्रपटाचे टायटल लिटिल लोलिता मंकी गॉड अंकल असे असेल. नाव ऐकल्यानंतर तर आपल्याला हे नक्कीच स्पष्ट झाले असेल. 


कारण कबीर खानच्या दिग्दर्शनाखाली बनलेला चित्रपट बजरंगी भाईजानची कथा हनुमान भक्त बजरंगीची आहे, जो चुकून भारतात आलेल्या पाकिस्तानी मुलीला सोडण्यासाठी आपल्या शेजारील देशात जातो. २०१५ मध्ये आलेल्या या चित्रपटाला भारतीय बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळाले होते व तेव्हापासून मेकर्सची चीनच्या मार्केटवर नजर होती. बजरंगी भाईजान चीनमध्ये प्रदर्शित करण्याची पूर्ण तयारी झाली आहे. या चित्रपटाचे पाकिस्तानमध्येही प्रचंड कौतुक झाले होते.