Breaking News

'नागिन-३'मध्ये नसणार मौनी


मौनी रायने नागिन बनून तब्बल दोन सिझनमध्ये प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. या मालिकेनंतर तिचे फॅन फॉलोइंगदेखील खूप वाढले होते, परंतु आता तिच्या चाहत्यांकरिता एक वाईट बातमी आहे. नागिनच्या आगामी सिझनमध्ये मौनी राय दिसून येणार नाही.
एकता कपूरने केवळ मौनी रायलाच नव्हे, तर या मालिकेमध्ये काली नागिन बनलेल्या अदा खानलादेखील बाहेरचा रस्ता दाखवला आहे. एकताने स्वत: ही गोष्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. एकता आता एका नव्या नागिनच्या शोधात आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर लिहिले आहे की, ती लवकरच नव्या नागिनचा खुलासा करणार आहे. 

मौनी लवकरच अक्षय कुमारचा चित्रपट गोल्डद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. कदाचित आता तिला आपल्या फिल्मी करिअरवर फोकस करायची इच्छा आहे. त्यामुळे तिने सीरिअलमधून ब्रेक घेण्याचे ठरवले असावे.