Breaking News

सापडलेल्या बालकांच्या पालकांबाबत माहिती देण्याचे आवाहन


अंधेरी (पश्चिम) येथील वीरा देसाई मार्गावरील सेंट कॅथरीन्स होममध्ये दाखल असलेल्या अभय, अमेय, रविकुमार, माहिर व काळूबाई या अनाथ बालकांच्या पालकांबाबत कोणाला माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा सेंट कॅथरीन्स होम (दूरध्वनी क्रमांक 022-26766906 किंवा 26762312) येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याच्या बाल संरक्षण अधिकारी यांनी तसेच सेंट कॅथरीन्स होमच्या अधीक्षकांनी केले आहे.
अभय हे बालक 2 जून 2016 रोजी वर्सोवा पोलिसांना सापडले होते. बालकल्याण समितीच्या आदेशान्वये या बालकास सेंट कॅथरीन्स होममध्ये दाखल करण्यात आले आहे. अमेय हे बालक वांद्रे पोलिसांना 18 मार्च 2016 रोजी सापडले होते. रविशकुमार हे बालक वांद्रे पोलिसांना 3 जुलै 2016 रोजी सापडले होते. माहीर हे बालक दा. नौ. नगर पोलिसांना 12 जुलै 2016 रोजी सापडले होते तर काळुबाई ही बालिका एका स्वयंसेवी संस्था सदस्याद्वारे बालकल्याण मंडळ समितीच्या आदेशान्वये सेंट कॅथरीन्स होम येथे दाखल करण्यात आली आहे. या बालकांबाबत अद्याप त्यांच्या पालकांनी संपर्क साधलेला नाही. तरी सेंट कॅथरीन्स होममध्ये दाखल असलेल्या या अनाथ बालकांच्या पालकांबाबत कोणाला माहिती असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.