Breaking News

सहा वर्षाच्या चिमुरड्या भाचीवर वीस वर्षीय तरुणाने केला बलत्कार

पालघर, दि. 13, डिसेंबर - वसईतील 20 वर्षीय तरुणानं चॉकलेटचे आमिष दाखवत आपल्या सहा वर्षीय भाचीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. वसई पोलिसांनी त्या नराधमला अटक केली असून पॉस्कोच्या कलमाअंतर्गत कलम 4 आणि 5 नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सहा वर्षाची चिमुकली पालघऱ येथे राहत असून शुक्रवार, 8 डिसेंबर रोजी ती वडिलांसोबत आजीला भेटण्यासाठी वसईला आली होती. शनवारी त्या 20 वर्षीय मुलानं तिला चॉक लेट देत वसई किल्यावर नेल तो नात्यानं तिचा मामा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. त्या नराधमानं चॉकलेटचं आमिष देत त्या चिमुकलीसोबत वसई किल्यावर बलात्कार केला.

सहा वाजण्याच्या सुमारास चिमुकली घरात कोणालाही न सांगता त्या युवकाबरोबर बाहेर गेली. आठ वाजत आले तरी ती घरी आली नाही. हे पाहून तिच्या वडिलांनी त्या तरुणाला फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर पोलिसांची मदत घेण्यात आली. रात्री साडे दहावाजता मुलीच्या चुलतीनं त्या नराधमास पापडी गावात पा हिलं. त्यावेळी ती मुलगी त्याच्यासोबत होती. चिमुकलीच्या चेहर्‍यावर जखम झाल्याचे स्पष्ट दिसत होतं. त्यावेळीच मुलीच्या चुलतीन क्षणाचाही विलंब न करता पोलिसांना क ळवलं. त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसानं त्या नराधमास पकडून बेड्या घातल्या. त्या नराधमानं गुन्ह्याची कबुली दिली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. वैदकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी चिमुकलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट केलं आहे.