Breaking News

वाहतूक नियम पाळा अपघात टाळा - उपअधीक्षक सोनाली कदम


जामखेड/ शहर प्रतिनिधी/- वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकीकडे प्रदूषण तर दुसरीकडे अपघात वाढत चालले आहेत.मात्र अपघाताचे नियम पाळा व अपघात टाळा. असा महत्वपूर्ण सल्ला जामखेड महाविद्यालय येथे रस्ते सुरक्षा, वाहतुक नियंत्रण व जागरूकता यावर विषेश मार्गदर्शनपर बोलताना पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांनी विद्यार्थ्यांना दिला. 
येथील जामखेड महाविद्यालय व राष्ट्रीय छात्र सेना, १७ महाराष्ट्र बटालियन यांच्या सयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा, वाहतुक नियंत्रण व जागरूकता या विषयावर प्रा मधुकर राळेभात यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या वेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे क्रिडा संचालक प्रा. मधुकर राळेभात तसेच कार्यक्रमाला राष्ट्रीय छात्रसेनाचे आयोजक केळकर, सुधीर पवार ,प्रा.उगले, प्रा गोलेकर एस. एम.,प्रा.डॉ.कांबळे ए.एच, प्रा.पवार डी.के, प्रा.जाधव जी. एम, प्रा. किरदात, काळू गायकवाड व सागर गायकवाड यांच्या सह महाविद्यालयातील एन. सी. सी. चे कॅसेटस व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.