Breaking News

शेती उत्पादन वाढीसाठी अवधूत शिवानंद करणार मार्गदर्शन

अहमदनगर : प्राचीन भारतीय शास्त्रानुसार मनुष्याच्या अंतरंगात अनंत ज्ञान व सुप्त शक्ती सुप्त स्थितीत असतात.या ज्ञानाला व शक्तीला जागृत करून मनुष्य स्वत:बरोबरच वनस्पती आणि पशुंनाही चांगले करू शकतो.याच भावनेतून अवधूत शिवानंदजी महाराज देशभरात शेतक-यांना मार्गदर्शन करीत त्यांना संजीवनी शक्ती व दुर्गा सप्तशतीचे ज्ञान व दिक्षा देत आहेत.शेतक-यांचा सर्वांगीण विकास व कृषी उत्पादनात भरीव वाढ होण्याच्या दृष्टीने त्यांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे करण्यात आले आहे. 19 व 20 डिसेंबर रोजी शिवयोग परिवाराच्यावतीने हे शेतकरी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.


पुणतांबा येथील चांगदेवनगर येथील श्री साई समर्थ ऍग्रो लि. येथे सकाळी 9 ते दुपारी 3 या कालावधीत हे शिबीर होणार असून ते सर्व शेतक-यांसाठी मोफत आहे. या शिबिरात शास्त्रशुध्द पध्दतीने रासायनिक खतांचा वापर न करता शेती कशी करावी, ऋतुमानाची अनुकुलता,उत्पादन वाढीसाठी व उत्पादनाच्या दर्जासाठी करावयाचे प्रयोग याबाबत अवधूत शिवानंदजी मार्गदर्शन करणार आहेत. शिवयोग परिवाराच्या शेतीविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेतलेले शेतकरीही या शिबिरात सहभागी होऊन आपले अनुभव कथन करणार आहेत.त्यामुळे शेती व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्याचे सामर्थ्य असलेल्या या शिबिराचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घेण्याचे आवाहन शिवयोग परिवारातर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी 9766329598, 9960474035 व संपर्क करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.