Breaking News

ठकसेन पोलीसपुत्राला सात दिवसांची पोलीस कोठडी

सांगली, दि. 16, डिसेंबर - मलेशियात नोकरीच्या आमिषाने बेरोजगार युवकांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कौस्तुभ सदानंद पवार (वय 32, रा. शिवराज कॉलनी, भारत सूतगिरणीनजीक, सांगली) या पोलीस पुत्राला येथील न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.


कौस्तुभ पवार व त्याचा मित्र धीरज पाटील या दोघांनी मलेशियात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गुरूनाथ कुंभार व दीपक माने (दोघेही सोलापूर), मोहन शिंदे (अहमदनगर) व सदानंद धनगर (जळगाव) या चौघांकडून पाच ते सहा लाख रूपये घेतले. या चौघांनाही या दोघांनी मलेशियात गेल्यानंतर हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली. 

मात्र या चौघांकडेही वर्किंग व्हिसा नसल्याने त्यांना मलेशिया पोलिसांनी अटक केली.गत आठवड्यात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कौस्तुभ पवार व धीरज पाटील पसार झाले होते. मात्र सांगली शहर पोलिसांनी कौस्तुभ पवार याला अखेर अटक केली. त्याला येथील न्यायालयासमोर उभे केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.