Breaking News

नेरळ स्थानकावर पादचारी पुलाचे गर्डर लाँच करण्याकरिता पॉवर ब्लॉक

मुंबई, दि. 01, डिसेंबर - मध्य रेल्वे प्रशासनाने 3 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत नेरळ स्थानकावर पादचारी पुलाचे गर्डर लाँच करण्याक रिता ट्रॅफीक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक बदलापुर आणि कर्जत स्थानकादरम्यान अप आणि डाऊन (दक्षिण-पुर्व) मार्गावर घेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.


या कारणास्तव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 9.11 वाजता आणि 10.36 वाजता सुटणारी सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथ स्थानकापर्यंत चालविण्यात येईल. तर सीएसएमटी येथून 9.38 वाजता आणि 11.15 वाजता सुटणारी सीएसएमटी-कर्जत लोकल बदलापुर स्थानकापर्यंत चालविण्यात येईल. याचप्रमाणे ठाणे येथून 10.48 वाजता सुटणारी ठाणे-कर्जत लोकल बदलापुर स्थानकापर्यंत चालविण्यात येईल आणि कर्जत येथून 12.01 आणि 1.00 वाजता सुटणारी कर्जत-सीएसएमटी लोकल अंबरनाथ स्थानकापासून चालविण्यात येईल.