Breaking News

नैराश्यातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या


पुणे, दि. 01, डिसेंबर - स्वतःला झालेला दुर्धर आजार आणि मोठ्या मुलाच्या मृत्यूचा ताण असह्य झाल्याने राहत्या घरी गळफास घेऊन 55 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. ही घटना मोशी येथे सकाळी उघडकीस आली. प्रमिला प्रकाश हासे (वय 55 रा. मोशी) असे या महिलेचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमिला यांना एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. 

त्यात दहा वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचाही मृत्यू झाला होता. या सा-या गोष्टींचा ताण असह्य झाल्याने प्रमिला यांनी काल रात्री घरातील सगळे झोपले असताना रहात्या घरी हॉलमध्ये पंख्याला ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी त्यांचा धाकटा मुलगा उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.