Breaking News

तरुणावर प्राणघातक हल्ला करणारा आरोपी दोन वर्षानंतर गजाआड


ठाणे, दि. 01, डिसेंबर - येथील तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपीला दोन वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. या आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकने मुंब्र्यातून अटक केली असून तो सौदी अरेबियाला पळून गेला होता, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. आदिल सुफियान खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

4 मार्च 2015 रोजी अजीर गुलाम चरफरे (20) या युवकावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला होता. त्याच्या तक्रारीनंतर 17 वर्षीय अल्पवयीन मुलासह कामरान इजाज शेख आणि आदिल या तिघांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह कामरान याला अटक केले होते. मात्र, आ दिल दोन वर्षांपासून फरार होता.