Breaking News

प्लास्टिक पुनर्वापर आणि घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात संशोधन आवश्यक - सुभाष देसाई


पर्यावरणाला नुकसान करणारे प्लास्टिकचा पुनर्वापर करता यावा, तसेच वाढत्या नागरिकरणामुळे दिवसेंदिवस गंभीर होत असलेल्या घनकचरा व्यवस्थापनासाठी रासायनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांनी संशोधन करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
रासायनिक तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार आणि ३० व्या वार्षिक मेळाव्याच्या निमित्ताने ते बोलत होते.श्री.देसाई पुढे म्हणाले, शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक क्षेत्राने समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.

यावेळी डॉ. क्रिष्णा देव प्रसाद निकम, डॉ. विलास डहाणूकर, डॉ. अनिश अंधेरिया, डॉ.अरविंद लाल यांचा विशेष ॲल्युमनी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी रेश्मिक मिनरल ॲण्ड केमिकल कंपनीचे संचालक सुनिल वर्गिस, कुलगुरू पद्मश्री प्रोफेसर जी. डी. यादव आदी मान्यवर उपस्थित होते.