Breaking News

नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान शनिवारी चार नक्षल्यांना अटक


छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान शनिवारी चार नक्षल्यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी राज्यातील कोंडागाव जिल्ह्यात एका महिलेसह ५ नक्षल्यांनी जिल्हा मुख्यालयात पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण केले होते. या भागातील नक्षली मोहिमेला या दोन्ही घटनेने हादरा बसला आहे.
नक्षलग्रस्त बिजापूर जिह्यातील जंगलात केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) व जिल्हा पोलीस पथकाने राबविलेल्या मोहिमेत ४ नक्षल्यांना अटक करण्यात आली. पिडोरम पोयम, चिन्ना पोयम, सुखराम भास्कर अशी या नक्षल्यांची नावे आहेत. यामध्ये सुखमती हेमला नामक महिला नक्षलीचाही यामध्ये समावेश आहे. 

दुसरीकडे, कोंडागाव जिल्ह्यातील मरदापाल पोलीस ठाण्यातील दुर्गम गावात राहणाऱ्या सोंसाई कोरम(२६), हिराला नेटाम(२९), बीरसाई कोरम(२४), पिल्लूराम कश्यप(२६) चार जहाल नक्षल्यांसह सोमारी ऊर्फ सोनबती कश्यप या महिलेसह ५ नक्षल्यांनी शुक्रवारी आत्मसमर्पण केले.