लक्ष्मीकांत देशमुख अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी
नागपूर : बडोद्यात आयोजित 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या गळ्यात पडली आहे. लक्ष्मीकांत देशमुख हे विदर्भातील लेखक असून त्यांची 13 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासोबत राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप, रवींद्र गुर्जर अशी पंचरंगी लढत होती. मराठवाड्यातून माजी आयएएस अधिकारी व ज्येष्ठ कादंबरीकार, कथालेखक लक्ष्मीकांत देशमुख यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
त्यांना एकूण 427 मते पडली. विदर्भातून उमेदवारीसाठी उभे असलेले कथा व कादंबरीकार रवींद्र शोभणे यांना 357 मते पडली. लक्ष्मीकांत देशमुख यांनी 40 मतांनी त्यांचा पराभव केला. त्यांना दुसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख आणि शोभणे यांच्यामध्येच सूरूवातीपासून चुरस होती. मात्र लक्ष्मीकांत देशमुहख हे पहिल्या फेरीपासूनच पुढे होते. मराठवाडा साहित्य परिषदेने लक्ष्मीकांत देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला होता.
या निवडणुकीमध्ये एकूण 1070 मतदार होते. त्यापैकी 896 जणांनी मतदान केले. 14 मते अवैध ठरवली गेली. साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी काल शनिवारी मतदान झाले होते. आज सकाळी साडेनऊ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली होती. अध्यक्षपदासाठी समीक्षक डॉ. किशोर सानप, पुण्यातून कथा व कादंबरीकार राजन खान व ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर हे देखील उभे होते. लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्यसंपदा, अंधेरनगरी -कथा, इन्कलाब विरुद्ध जिहाद - कादंबरी, नंबर 1-कथासंग्रह, ऑक्टोपस - कथासंग्रह, पाणी! पाणी!, प्रशासननामा - कायदेवि