काही तासांतच वटणार चेक ?
मुंबई : बँकेत चेक जमा केल्यावर ते पैसे खात्यात वटण्यासाठी लागणारा अवधी लवकरच कमी होणार आहे. चेक क्लिअरिंग हाऊस नावाची संकल्पना आता हद्दपार होणार आहे. यापुढे ऑनलाईन पद्धतीने बँकेतले तुमचे चेक खात्यात वळते केले जाणार आहेत. सध्या, स्थानिक चेक असेल, तर तो वटण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात.
तर, परराज्यातील चेक वटण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागतो. आंतरराष्ट्रीय चेक क्लिअरन्ससाठी तर दोन-दोन आठवडे थांबावं लागतं. मात्र हा कालावधी आता घटणार आहे. एक्स्प्रेस चेक क्लिअरन्सप्रमाणे प्रत्येक चेक आता डिजीटल किंवा ऑनलाईन क्लिअर होणार आहेत. त्यामुळे कोणताही चेकचे पैसे काही तासातच तुमच्या खात्यात जमा होण्याची चिन्हं आहेत.
