पीक विमा लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या बँकेत, पीक विमा पोर्टलवर उपलब्ध - पांडुरंग फुंडकर
श्री. फुंडकर म्हणाले, खरीप हंगाम 2017 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सर्व माहिती, शेतकऱ्यांचा संपूर्ण तपशील केंद्र शासनाने सुरु केलेल्या पीक विमा पोर्टलवर विमा कंपनी व बँकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच पीक विमा मंजूर झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी विमा कंपनीकडून सॉफ्ट कॉपी स्वरुपात तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात गुगल ड्राईव्ह लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातील पीक विमा मंजूर झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या शासकीय कार्यालयात व विमा कंपनीच्या वेब साईटवर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, असे श्री. फुंडकर यांनी शेवटी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतीश चव्हाण, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.