सचिन सावंत टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई
सांगली, दि. 20, डिसेंबर - कुख्यात गुन्हेगार म्हणून ओळख निर्माण झालेले माजी नगरसेवक सचिन रमाकांत सावंत याच्यासह त्याच्या दहा जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. सध्या हे सर्वजण एका खूनप्रकरणी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात आहेत.
मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यात सचिन सावंत याच्यासह शाम बापू हात्तीकर (वय 26), सौरभ संजीवकुमार शितोळे (वय 20), करण बाळू शिंदे (वय 19), इम्रान मज्जीद आवटी (वय 26), सिध्दार्थ भास्कर कांबळे (वय 28), विशाल उर्फ गौरव विजय गायकवाड (वय 28), विशाल बाळू कांबळे (वय 23), सुनील नारायण कांबळे (वय 28) व नागेश विजय ऐदाळे या दहा जणांचा समावेश आहे.
पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने व विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरू, पोलीस नाईक विशाल भिसे व अभिजित गायकवाड यांनी ही कारवाई केली. सचिन सावंत हा राष्ट्रवादी काँग्रेसचा दिवंगत नगरसेवक दादासाहेब सावंत याचा लहान भाऊ असून या सावंत टोळीविरोधात यापूर्वी तत्कालीन पोलीस अधिक्षक रितेश कुमार यांनी मोक्क ाअंतर्गत कारवाई केली होती. या टोळीविरोधात खुन, खुनाचा प्रयत्न, मारामारी, सावकारी व जबरी चोरी असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.