Breaking News

प्रसिध्द आर्किटेक्ट विकास दिलावरी यांना रोटरी व्होकेशनल एक्सलेंस पुरस्कार

ठाणे, दि. 01, डिसेंबर - रोटरी क्लब ऑफ ठाणे नार्थ न्ड यांच्या सौजन्याने पंधरा वेळा युनेस्को अ‍ॅवार्ड विजेते पद प्राप्त केलेले प्रसिध्द आर्किटेक्ट विकास दिलावरी यांना या कार्यक्रमात रोटरी व्होकेशनल एक्सलेंस पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 2 आणि 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन डिस्ट्रीक्ट गर्व्हनर (2019-20) डॉ मोहन चंदावरकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.


आर्किटेक्ट रोहीत शिंक्रे आर्किटेक्ट प्रशांत सुतारीया आर्किटेक्ट रेखा देसाई, मोटिव्हेशनल स्पीकर जे बी काबरा,कॉर्पोरेट ट्रेनर सुरेश श्रीनिवासन यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे  आर्किटेक्टचर महाविद्यालयातील मुले-मुली सहभागी होणार आहेत. या मुलामुलींसाठी वेगवेगळया स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. दोन दिवसाच्या या भरगच्च क ार्यक्रमातमुलांना बॉडी लँग्वेज,पर्सनॅलिटी डेव्हलोपमेंट,प्रोफेशेनल एक्सलंसी तसेच लीडरशिप स्कील आणि सर्वांगिंण विकासाच्या दृष्टीने वक्ते आपली मते मांडून मुलांना त्याचा फायदा कसा होईल याकडे कल असणार आहे. या कार्यकमात भाग घेणा-या सर्व स्पर्धकांना रोटरी क्लबतर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना पारितो षिके आणि रायला किंग, रायला क्विंन ही विशेष पारितोषिके बहाल करण्यात येणार आहेत.