Breaking News

चेंबूर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे.


मुंबई, दि. 12, डिसेंबर - हार्बर रेल्वे मार्गावरील चेंबूर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अप दिशेने होणा-या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.रेल्वे प्रशासनाकडून दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळच्या वेळेत झालेल्या गोंधळामुळे चाकरमान्यांचे हाल होत असून प्रवाशांना नाराजीचा सूर उमटत आहे.