Breaking News

बळीराजा जलसंजीवनी योजनेतंर्गत मंजूर झालेली सिंचन प्रकल्पांची कामे वर्षभरात पूर्ण करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


अकोला : शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजनेतंर्गत मंजूर झालेली सिंचन प्रकल्पांची जास्तीतजास्त कामे एक वर्षात पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावू, अशी ग्वाही मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अकोला तालुक्यातील गांधीग्राम येथे आज केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी योजनेतंर्गत जिल्ह्यातील 11 प्रकल्पांचे कार्यान्वितीकरण आणि राष्ट्रीय मार्गांचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी केद्रींय परिवहन महामार्ग, जहाजबांधणी, जलसंधारण आणि गंगा शुद्धीकरण विभागाचे मंत्री नितीन गडकरी होते. 

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, गृहराज्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे, आमदार सर्वश्री गोपीकिशन बाजोरिया, गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, हरीष पिंपळे, बळीराम सिरस्कार, रणधीर सावरकर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस. चहल, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागरआदी व्यासपीठावर उपस्थित होते.