Breaking News

खड्डे दुरुस्ती झाली नाही त्याविरोधात शिवसेनाचे आंदोलन

श्रीगोंदा/ प्रतिनिधी/- तालुक्यातील खड्डे दुरुस्त केले नाही या निषेधार्थ शिवसेना जिल्हा समनव्यक घनश्याम शेलार सोमवार दि 18 रोजी आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले आहे.शिवसेनेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की राज्यात दि 15 डिसेंबर अखेर एक ही खड्डा दिसणार नाही. 

या बाबत असे आदेश अधिकाऱ्यांना देऊन ही मात्र श्रीगोंदे तालुक्यात शासनाचे खड्डे मुक्त अभियानाचा पुरता बोजवारा उङला. तालुक्यातील एक हि रस्ता खड्डे मुक्त झालेला नाही. त्यामुळे शिवसेना तालुक्यातील खड्डे दुरुस्त केले नाही च्या निषेधार्थ आंदोलन करणार आहे. शिवसेना जिल्हा समनव्यक घनश्याम शेलार सोमवार दि 18 रोजी आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले आहे.