Breaking News

ब्रह्मोससाठी सुखोई विमानांत बदलास सुरुवात.

नवी दिल्ली : ब्रह्मोस सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणास सक्षम करण्याच्या दृष्टीने देशाच्या ४० सुखोई लढाऊ विमानांत योग्य ते बदल करण्याचे काम सुरू केले जात आहे. यावर काम सुरू करण्यात आले असून २०२० पर्यंत ही योजना पूर्णत्वास येईल असे अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे. 


हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कारखान्यात या विमानात योग्य ते बदल केले जाणार आहेत. गत २२ नोव्हेंबर रोजी ब्रह्मोसची सुखोई-३० लढाऊ विमानावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. अडीच टन वजनाच्या ब्रह्मोसची मारक क्षमता २५० किलोमीटर इतकी आहे..