Breaking News

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अपघातात तिघांचा मृत्यू

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर दोन भरधाव गाडयांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


पुण्याहून मुंबईकडे येणा़र्‍या लेनवर खालापूरजवळ हा अपघात असून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इनोव्हा आणि रिट्झ गाड्या एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणा़र्‍या इनोव्हा गाडीचा मागचा टायर फुटला आणि गाडीचा वेग आवरण्याच्या प्रयत्नात ही गाडी समोरच्या लेनमधून जाणा़र्‍या रिट्झ गाडीला धडकली. दोन्ही गाडया वेगात एकमेकांना धडकल्याने त्यातली एक गाडी उलटली. या दुर्घटनेत तीन प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.