Breaking News

नेप्ती मध्ये चार दारु अड्यांनवर छापे तीन आरोपींना अटक ऐक फरार


नगर ता प्रतिनिधी:नगर तालुक्यातील नेप्ती परिसरामध्ये अवैध्य गावठी दारु अड्डे सुरु असल्याची माहिती नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांनी मिळाली पोलीस उप अधिक्षक मनीष कलवानिया यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि परदेशी, आनंद सत्रे ,विनोद पवार ,संदीप जाधव , अशोक अबनवे, दलवी या़ंच्या पथकाने विधिध ठिकाणी छापे टाकुन ८०० लिटर अवैध गावठी हातभट्टीची सुमारे ४८००० हजार रुपये किमतीची दारु जप्त करण्यात आली असुन कुमार फलके,अरुण मोरे,सुभाष गायकवाड यांना अटक करण्यात आली आरोपींनवर कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास पोलीस नाईक अशोक अबनावे,व पोलीस नाईक दळवी हे करत आहेत नगर तालुका प़ोलीसांनी तीन महिण्यामध्ये सुमारे २९ अवैध्य दारुअड्डयांनवर छापे मारले असल्याने अवैध्य व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहेत