Breaking News

संगमनेर-ब्राम्हणवाडा-कल्याण बस सुरु करण्याची ग्रामस्थांची मागणी


संगमनेर/प्रतिनिधी । ०१ - सन १९६२ पासून सुरु असलेली संगमनेर आगारातून घारगाव मार्गे वनकुटे अशी मुक्कामी बस सुरु होती. मात्र हि बस कधीही वेळेवर धावल्यामुळे प्रवास्यांना प्रवासासाठी इतर साधनांचा वापर करावा लागत असे त्यामुळे हि बस तोट्यात गेल्याने ती बंद करण्यात आली. दरम्यान तालुक्यातील घारगाव, बोरबन, कौठे, बनकुटे, ब्राम्हणवाडा, औतुर या सह परिसरातील अनेक गावचे नौकरी धंद्यातील नागरिक कल्याण, ठाणे, मुंबई येथे राहतात किंवा ये-जा करतात. या नागरिकांसाठी अथक प्रयत्नातून संगमनेर -घारगाव,वनकुटे,ब्राम्हणवाडा, कल्याण हि बस सुरु करण्यात आली होती. हि बस स. ६. ४५ वा. संगमनेर येथून सुटून दुपारी १२. ४५ कल्याण व सांयकाळी ८ वा. पुन्हा संगमनेर अशी सुरु होती.
या बस मुळे अनेक नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली होती. हि बस सेवा सुमारे सात वर्षे सुरु होती. तसेच ती फायद्यातही चालत होती. मात्र परिवहन विभागाने या बसला तोटा दाखवून हि सेवा बंद केल्याचा आरोप प्रवाशी नागरिकांनी निवेदनात केला आहे. या भागातून हि एकमेव बस कल्याण मुंबईकडे जात होती. त्याचा मोठा फायदा येथील प्रवाशी विध्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कामगार,शेतकरी होत होता. हि बस सेवा बंद झाल्यामुळे येथील सर्व प्रवाशांना मुठीत धरून खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. सदर बस सेवा पुन्हा सुरु म्हणून येथील नागरिक, आ. बाळासाहेब थोरात वापालक मंत्री ना. रामशिंदे यांच्या आदेशावरून हि बस सेवा पुन्हा सुरु करण्यात आली. मात्र संगमनेर आगरप्रमुखाशी, त्यात मेख भारत हि बस संगमनेर, साकुर, जांबुत वनकुटे अशी सुरु केली आहे. या बसचा कुठलाही फायदा घारगाव, वनकुटे, ब्राम्हणवाडा या गावांना होत नाही. केवळ मंत्र्यांच्या आदेश पाळत त्यांनी नागरिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. या चुकीच्या व गैरसोयीच्या बसला प्रवाश्यांनी प्रतिसाद ना मिळाल्याने हि बस बंद करावी लागली होती.

वरील सर्व गोष्टींचा सरकारने विचार करून पठार भागासाठी संगमनेर- घारगाव, वनकुटे, ब्राम्हणवाडा,औतुर मार्गे बससेवा पूर्ववत सुरु करावी यामुळे परिवहन उत्पादनात देखील वाढ होईल. यामुळे हि बससेवा अवकारात सुरु करावी अन्यथा संतप्त ग्रामस्थांकडून मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा सर्व ग्रामस्थांनी केला आहे.