Breaking News

सामाजिक उत्तरदायित्व या भावनेने रक्तदान होणे गरजेच -पो.नि.अभय परमार

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक उत्तरदायित्व या भावनेने रक्तदान होणे गरजेचे आहे. रक्ताची गरज सर्वांना पडते. रक्ताला जात धर्म नसते. रक्तदान सारखे सामाजिक उपक्रम घेतल्यास रक्ताचा तुटवडा भासणार नाही. मोहंमद पैगंबर यांनी अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी सांगितलेल्या विचारांवर चालण्याची खरी गरज असून, सामाजिक ऋण फेडण्यासाठी युवकांनी रक्तदान करण्याचे आवाहन कोतवाली पोलिस स्टेशनचे पो.नि.अभय परमार यांनी केले. 


ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्त तख्ती दरवाजा मस्जिद व ईद ए मिलाद कमिटीच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्याउद्घाटनाप्रसंगी पो.नि. परमार बोलत होते. यावेळी अंन्जर नदवी, अब्दुल कादिर शेख, शहा फैसल, राजू शेख, शफाकत शेख, आबिद खान, वहाब सय्यद, अ‍ॅड.शिवाजी कराळे, हाजी उमर, ईस्माइल शेख, अल्तमाश जरीवाला, नईम सरदार, आबिद शेख, इमरान खान, अब्दुल कादिर, साजिद सय्यद, तन्वीर शेख, हाजी मोहंमद, यामीन शेख, गुलाम दस्तगीर, जाकिर सय्यद, रियाज सय्यद, नदिम शेख, अस्लम शेख आदि उपस्थित होते.
शिबीराच्या प्रारंभी मौलाना अलीमोद्दीन रिजवी यांनी पवित्र कुरानचे पठण केले. प्रास्ताविकात शहा फैसल यांनी मोहंमद पैगंबर जयंती निमित्त राबविण्यात येणार्‍या विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. मौलाना अलीमोद्दीन रिजवी यांनी तहानलेल्यास पाणी पाजणे, एखाद्या मनुष्याला वाचविण्यासाठी रक्तदान करणे पुण्याचे काम असल्याचे स्पष्ट केले. या शिबीरात मुस्लिम समाजातील युवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अंन्जर नदवी यांनी केले. आभार अब्दुल कादिर शेख यांनी मानले.