Breaking News

जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर

सांगली, दि. 12, डिसेंबर - जिल्ह्यातील जत नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष व सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. जत नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी दिनांक 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान झाले होते. त्यासाठीची मतमोजणी आज पार पडली.


जत नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्षपदी शुभांगी अशोक बन्नेनवर विजयी झाल्या.
जत नगरपरिषद सदस्य निवडणूक प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे. प्रभाग 1 - वनिता साळे, आप्पासो पवार. प्रभाग 2 - संतोष कोळी, गायत्रीदेवी शिंदे. प्रभाग 3 - दिप्ती सावंत, प्रमोद हिरवे. प्रभाग 4 - संतोष कांबळे, श्रीदेवी सगरे. प्रभाग 5 - अश्‍विनी माळी, इकबाल गवंडी. प्रभाग 6 - विजय ताड, जयश्री शिंदे. प्रभाग 7 - स्वप्नील शिंदे, बाळाबाई मळगे, प्रभाग 8 - भारती जाधव, प्रकाश माने. प् 9 - जयश्री मोटे, लक्ष्मण एडके. प्रभाग 10 - नामदेव काळे, कोमल शिंदे.