Breaking News

राज्य अजिंक्यपद कराटे स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड


अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य अजिंक्यपद कराटे स्पर्धेसाठी अहमदनगर अर्बन अ‍ॅण्ड रुरल कराटे डी असो. च्या वतीने जिल्हास्तरीय कराटे निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या या निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य अ‍ॅथेलेटिक्स संघटनेचे सहसचिव दिनेश भालेराव यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीराम आवारे, जिल्हा प्रतिनिधी अमोल काजळे, जयसिंग काळे, प्रशांत पालवे, सर्फराज सय्यद, महेश गायकवाड, शुभम जोशी आदि उपस्थित होते.
दिनेश भालेराव म्हणाले की, खेळामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली असून, खेळाडू विविध स्पोर्टस क्लबच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत आहे. कराटे खेळाला ऑलंम्पिकची मान्यता मिळाली असल्याने नोकरी, भरती व शालेय गुणांसाठी या खेळाचा लाभ होत आहे. मात्र त्यासाठी अधिकृत परवानगी असलेल्या स्पर्धेत सहभागी होण्याची गरज असते. अनेक गुणवंत खेळाडूंना माहिती नसल्याने त्यांची दिशाभुल होण्याचे प्रकार उघडकीस येत असून, खेळाडू व त्यांच्या पालकांनी जागृक राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

या स्पर्धेत वरिष्ठ वयोगटात मुले व मुलींचा उत्सफुर्त सहभाग लाभला. यामधील विजयी खेळाडूंची इंडियन ऑलम्पिक मान्यता प्राप्त कराटे असो. ऑफ इंडिया व महाराष्ट्र कराटे स्पोर्टस असो.च्या मान्यतेने मुंबई येथे शुक्रवार दि.15 ते 17 डिसेंबर दरम्यान होणार्‍या राज्य अजिंक्यपद कराटे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. पात्र खेळाडूंची नांवे पुढील प्रमाणे मुले:- प्रविण गीते (50 किलो वजनगट), आदित्य क्षीरसागर (55 किलो वजनगट), विशाल घोडगे (60 किलो वजनगट), शहाजी दगडे (67 किलो वजनगट), शुभम जोशी (75 किलो वजनगट), आकाश दळवी (84 किलो वजनगट), प्रशांत पालवे (खुला वजनगट), मुलींमध्ये- प्रिती मगर (45 किलो वजनगट), प्रतिक्षा रोहोकले (50 किलो वजनगट), आश्‍विनी जाधव (55 किलो वजनगट), युगांशी गवळी (61 किलो वजनगट), गौरी गागरे (68 किलो वजनगट), कुमीते गटासाठी- भास्कर कावरे, विजय दांगट, वसिम पठाण, अमोल माळी.