Breaking News

लासलगाव रेल्वे उड्डाणपूल, वळण रस्त्यासाठी भुजबळांचे जेलमधून पत्र

लासलगाव, दि. 30, डिसेंबर - नाशिक जिल्ह्यातील प्रकाशा-लासलगांव-विंचूरटा रामा क्र.7 या रस्त्यावर लासलगांव रेल्वे उड्डाणपूल बांधणे, वळणरस्ता व उड्डाणपुलाच्या पोहोच मार्गाच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी राज्याचे माजी उंत्री आ. छगन भुजबळ यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.


छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या लेखी पत्रात म्हटले, आप्रकाशा-लासलगांव-विंचूर-भरवसफाटा रामा क्र.7 या रस्त्यावर लासलगांव रेल्वे उड्डाणपूल बांधणे, वळणरस्ता व उड्डाणपुलाचा जोडरस्ता या कामाला शासन निर्णय दि.14 फेब्रुवारी 2008, दि.31 ऑक्टोबर 2009 व दि.27 नोव्हेंबर 2012 अन्वये प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. उड्डाणपूल, वळणरस्ता व उड्डाणपुलाचा पोहोच मार्ग या कामाच्या वावातील उड्डाणपुलाचे बांधकाम हे रेल्वे विभागामार्फत पूर्ण झालेले आहे.

लासलगाव वळण रस्त्यासाठी व उडडाणपुलाच्या जोडरस्त्यासाठी एकुण 4.800 किमी लांबीकरीता दोन टप्प्यात भुसंपादनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. पहिल्या टप्प्यात राज्यमार्ग क्र.29 ते टाकळी विंचुर ते रामा क्र.7 पर्यंतच्या (2.570 किमी) रस्त्याचा भुसंपादन प्रस्ताव तयार करण्यात आला. लासलगाव शिवारातील जमिनीचा ताबा (1.18 हेक्टर) मिळाल्यामुळे नविन रस्त्याचे 0.870 किमी लांबीचे डांबरीकरणाचे काम पुर्ण करण्यात आले आहे.


टाकळी विंचुर शिवारातील भूसंपादनासाठी वाढीव दराने रक्कम अदा करण्याकरीता एकूण 2681.58 लक्ष तर रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी किमतीत रु.389.69 लक्ष सुधारीत अंदाजपत्रकाप्रमाणे वाढ झालेली आहे. तसेच टप्पा-2 रा.मा 29 ते विंचूर (2.230 कि.मी) साठी 4.585 हेक्टर जमिनीचा भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी,नाशिक यांचेकडे पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावासाठी मा.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,निफाड यांनी टाकळी विंचूरसाठी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे या प्रस्तावाची किंमत रु.603.93 लक्ष खर्च अपेक्षित आहे.