चिपळूण येथे अवैध दारूसाठा जप्त
रत्नागिरी - राज्य उत्पादनशुल्क विभागाने चिपळूणमध्ये 28 डिसेंबरच्या रात्री तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे साडेसात लाख रुपयांची बनावटीची दारू जप्त करण्यात आली. त्यासाठी वापरलेली वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत.
नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अवैध मद्याची चोरटया मार्गाने वाहतूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन रत्नागिरी विभागाच्या अधीक्षिका संध्याराणी देशमुख यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तात्पुरते वाहतूक तपासणी नाके उभारले आहेत. तेथे सर्व वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चिपळूण, खेड आणि रत्नागिरी विभागाच्या भरारी पथकाने वालोपे (ता. चिपळूण) येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर फरशी तिठा येथे तपासणी सुरू केली होती. तेव्हा एक वाहन तपासणीसाठी थांबविले असता त्यामध्ये गोवा बनावटीची चोरटी दारू आढळली. सुमारे 5 लाख 10 हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल तसेच वाहनही जप्त करण्यात आले. संशयित आरोपी राजेश प्रभाकर हरचिलकर याला अटक करण्यात आली. काल रात्री ही कारवाई करण्यात आली. त्याच ठिकाणी के लेल्या दुसर्या कारवाईमध्ये मोटारचालक दीपक महादेव उत्तेकर (वय 40 वर्षे रा. कुरवळ जावळी, ता. खेड) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 17 हजार 500 रुपयांची गावठी हातभट्टी आणि मारुती व्हॅन जप्त करण्यात आली. कोंडमळा, सावर्डे (ता. चिपळूण) येथील निवाची वाडी येथील सुनील सुभाष सावडेकर (वय 30) याला त्याच्या घराशेजारी गोवा मद्याची व गावठी हातभट्टी दारूची विक्री करताना रंगेहात पकडून त्याच्याकडून 26 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
एकूण तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तिघा आरोपींकडून 390 लिटर गावठी हातभट्टी दारू तसेच 480 लिटर गोवा बनावटीचे विदेशी मद्य तसेच दोन मारुती ओमनी व्हॅनसह एकू ण रुपये 7 लाख 39 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.