Breaking News

नाशिकचा औरंगाबाद वर एक डाव, 75 धावांनी विजय


नाशिक, - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनर्मार्फत घेण्यात येणार्‍या 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेच्या लीग मध्ये नाशिक ने मुस्तनगिर कांचवालाच्या 155 धावा, रोशन वाघसरे व साहिल बैरागी उत्कृष्ठ गोलंदाजीच्या जोरावर नाशिक ने औरंगाबाद चा 1 डाव व 75 धावांनी विजय मिळवत सुपरलीग मध्ये प्रवेश मिळविला.

नाशिक संघाने आपला पहिला डाव 57.1 षटकात 8 बाद 305 धावांवर घोषित केला, मुस्तनगिर कांचवाला ने तडाखेबंद फलंदाजी करत 145 चेंडूत 24 चौकारा सह 155 धावा केल्या, त्यास तनविर भामरा (55) व यशराज खाडे (38) यांनी चांगली साथ दिली, आशुतोष पराये ने 37 धावात 4 बळी मिळविले.

उत्तरादाखल औरंगाबाद संघ चांगल्या सुरवातीनंतर रोशन वाघसरे 5 बळी व साहिल बैरागी 3 बळी यांच्या उत्कृष्ट गोलंदाजी पुढे 33.4 षटकात सर्व बाद 122 धावा करू शक ला, कर्णधार संकेत पाटील ने 47 धावा केल्या. 183 धावांनी पिछाडीवर पडलेल्या औरंगाबाद संघास नाशिक ने फॉलोऑन दिला. दुसर्‍या डावात साहिल बैरागीच्या उत्कृष्ठ गोलंदाजी मुळे 23.3 षटकात 109 धावात आटोपला, साहिल ने 26 धावात 4 गडी बाद करत सामन्यात 7 बळी मिळविले, आर्यन सोळंकी ने 3 तर आर्यन चव्हाण ने 2 गडी बाद करत साहिलला चांगली साथ दिली.