Breaking News

ईद ए मिलाद मुळे संगमनेरचा आठवडे बाजार बंद राहणार


संगमनेर/ प्रतिनिधी।३० - शहरातील शनिवार आठवडे बाजार ईद ए मालाड हा सण असल्यामुळे बंद राहणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि ईद ए मालाड हा सण शनिवार २ डिसेंबर रोजी साजरा होणार असल्याचे शांतता कमिटीतील चर्चेतून निष्पन्न झाल्याने व ईद निमित्त काढण्यात येणारी मिरवणूक मार्गाचा बराचश्या भागात आठवडे बाजार भरत असतो त्यामुळे मिरवणुकीस अडथळा येऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी २ डिसेंबर रोजी शनिवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांनी पारित केला माहिती डॉ. सचिन बांगर यांनी दिली. शनिवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्याने बाजारकरू, विक्रते यांनी आपला माळ विक्रीस नये व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार साहेबराव सोनावणे व पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी केले आहे.