Breaking News

साकुरी येथी स्वस्त धान्य दुकान वेळेवर उघडत नसल्याने ग्रामस्थांना मनस्ताप


शिर्डी/प्रतिनिधी - साकुरी गावातील असलेले स्वस्त धान्य दुकान वेळेवर उघडत नसल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास होत असून अनेक ग्रामस्थ सकाळी नऊ वाजल्यापासून थेट १२ वाजे पर्यंत स्वस्त धान्य दुकानाच्या बाहेर वाट पाहत असल्याचे धक्कादाय चित्र दिसून आले सदरचे दुकान सतीगोदावरी महिला स्वयं. सहाय्यता बचत गटाला चालविण्यास दिलेले आहे दुकान कधी उघडेल कधी बंद होईल कधी माल आला आणि कधी गेला याचा उलगडा होत
नसल्याने लोक आज तरी दुकान उघडेल या आशेवर दुकानाच्या बाहेर बसलेले दिसून आले यात वयोवृद्ध महिला पुरुष यांचा समावेश होता हीच परिस्थिती रॉकेलच्या बाबत ही असून दुकानाच्या बाहेर चालकाचा मोबाईल नंबर ही लिहिलेला नव्हता एकीकडे सरकार गोरगरिबांना माफक दरात गहू साखर धान्य तांदूळ देण्याचा गाजावाजा करीत असताना राहाता तहसीलपासून २ किमी अंतरावर असलेल्या या रेशन दुकानाला वेळेचे बंधन आहे की नाही त्यांच्यावर पुरवठा विभागाचा वचक नसल्यामुळे की काय काही दुकानदार मन मानेल पद्धतीने दुकान चालू व बंद करीत असल्यामुळे लोकांना शासनाच्या सवलती पासून वंचित राहण्याची वेळ असली असून नागरिकांनी आपल्या अडचणी यावेळी व्यक्त करून काम धंदा सोडून कसे बसावे लागते व कसे वेठीस धरले जाते याचा भावना व्यक्त केल्या आहे या धान्य

दुकानाच्या अडचणीत तहसीलदर माणिक आहेर यांनी लक्ष घालून स्वस्त धान्य व रॉकेलच्या अडचणी मार्गी लावण्याची गरज असून डॉ.सुजय विखे यांनी ग्रामीण भागातील रेशनच्या अडचणी बाबत लक्ष घालण्याची मागणी काही वयोवृद्धांनी व महिलांनी केली आहे