Breaking News

साकुरीचा विकास कामांना प्राधान्य देऊ –सरपंच राजेंद्र दंडवते

शिर्डी/प्रतिनिधी - साकुरी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत जनतेमधून मला सरपंच पदाची संधी मिळाली आहे त्या माध्यमातून साकुरीच्या विकासासाठी प्रयत्न करून असे नूतन सरपंच राजेंद्र भानुदास दंडवते यांनी सांगितले साकुरीच्या उपसरपंचपदी सचिन योसेफ बनसोडे यांची निवड करण्यात आली दंडवते म्हणाले की निवडणूक संपली जय-पराजय हा ठरलेला असतो आता निवडणूक संपली सर्वांना बरोबर घेऊन साकुरीच्या विकासासाठी पाठपुरावा करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्ते पाणी वीज घरकुल शौचालय उपनगरातील रस्ते आदीं कामांबरोबरच प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देणार असून त्यासाठी ना.राधाकृष्ण विखे पा. जि.प.अध्यक्षा ना.शालिनीताई विखे डॉ.सुजय विखे पा. यांच्या माध्यमातून विकास कामांना प्राधान्यक्रम देणार असल्याचा संकल्प व्यक्त केला आहे 


साकुरी हे राहाता शहरालगत असल्याने पायाभूत सुविधा देताना अनेक अडचणी असल्या तरी त्यातून मार्ग काढून गाव स्वच्छते बरोबरच जास्तीत जास्त शौचालयाचा प्रश्न मार्गी लावणार असून त्यामुळे साथीचे आजार यांना अटकाव होण्यास मदत होणार आहे त्याबरोबरच प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असून जे घरकुल व शौचालय १५-२० वर्ष जुने झाले आहे त्यांना बांधकामासाठी शासनाच्या माध्यमातून काही मदत कशी मिळेल यासाठी देखील आपला पाठपुरावा राहणार असून सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन विकासाची कामे केली जाणार आहे.

त्याबरोबरच शिर्डी ते साकुरी जो मधल्या मार्गे रस्ता आहे त्या रस्त्यासाठी खडीकरण डांबरीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी साईबाबा संस्थानने निधी देण्याची गरज असून त्यासाठी संस्थानकडे पाठपुरावा करून २ किमीचा रस्ता मार्गी लावण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे सांगितले ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य विक्रांत दंडवते सविता लुटे रोहिणी दंडवते सुनील गोसावी शीलाबाई बनसोडे प्रदीप बनसोडे अंकुश भडांगे छाया बनसोडे राजेश लुटे निकिता रोहोम लताबाई शिरकांडे स्वप्नील बावके शकुंतला लूटे रंजना दंडवते भाऊसाहेब आहेर सुनिता बनसोडे ग्रामविकास अशिकारी रामदास डुबे यांच्या माध्यमातून कामे केली जाणार असल्याचे सांगितले.