आता खड्डेच सांगतात श्रीगोंद्याची हद्द
श्रीगोंदा/प्रतिनिधी/- अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे़. श्रीगोंदा तालुक्यात खड्डा नसलेला एकही रस्ता तुम्हाला शोधूनही सापडणार नाही़. त्यामुळे ‘खड्डे मुक्त रस्ता’ या अभियानाचा जिल्ह्यात पार बोजवारा उडाला आहे. तालुक्यातील चारही बाजुचे रस्ते खड्डेमय झाल्याने वाहनातून प्रवास करणाऱया प्रवाशांना खड्डे सुरू होऊन धक्के खाण्यास सुरवात झाली की समजून घ्यावे की आता श्रीगोंद्याची हद्द सुरू झाली, असे प्रवाशांना लक्षात येते़.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच रस्त्याची मोठी दुरवस्था ओढवलेली आहे़. त्यात श्रीगोंदा तालुकाही मागे राहिला नाही. श्रीगोंदा तालुक्यात खड्डा नसलेला एकही रस्ता राहिलेला नाही. श्रीगोंदा तालुक्यात येणारे चारही बाजुचे रस्ते खड्डेमय झाल्याने खड्डे सुरू झाले की श्रीगोंदा तालुक्याची हद्द सुरू झाली, असे प्रवाशांना लक्षात येते़. इतकी या शहराची बदनामी झालेली आहे. श्रीगोंदा हिरडगाव या रस्त्याची तर अक्षरश: चाळणी झाली असून, वाहनधारक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत़ खड्ड्यांमुळे रस्ता खिळखिळा झाला आहे़. श्रीगोंदा- जामखेड या रस्त्यावर गुडघ्या इतके खड्डे पडले असून, काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘नरेंद्र मोदी बुलेट एक्सप्रेस मार्ग’ असे रस्त्याचे उपहासात्मक नामकरण करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत़.
आभाळच फाटल्याची स्थिती असून, ठिगळे द्यायची तरी किती? असा प्रश्न आहे. त्यामुळे आता ‘खड्डेमुक्त रस्ते’ अभियान पुरेसे नसून निधीची आवश्यकता सर्वाधिक आहे. ती तरतूद करून सर्वच रस्त्यांची नव्याने बांधणी करण्याची गरज आहे़ श्रीगोंदा तालुक्यातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा अग्रक्रम लावला तर श्रीगोंदा- जामखेड तसेच श्रीगोंदा- हिरडगाव मार्गे कर्जत या रस्त्याचा राज्यात वरचा क्रमांक येईल़. ४५ किमी अंतराचा हा रस्ता जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे खिळखिळा झाला आहे़. मागील सहा महिन्यांत श्रीगोंदा तालुक्यातील खड्ड्यांचे प्रश्न वृत्तपत्र आणि सोशल मीडियातून गाजत असताना प्रशासनाकडून मात्र ठोस उपाययोजना झाली नाही़. तसेच दौंड नगर हा राज्य महामार्ग असून, जिल्ह्यातील सर्वाधिक वाहतुकीचा रस्ता आहे़.
मात्र या रस्त्यावर गुडघ्याइतके खड्डे पडले आहेत़ प्रत्येक एक फुटावर दुसरा खड्डा असल्याने रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे़. शहराला जोडणारा एकही रस्ता धड नसल्याने बांधकाम विभागाचे अस्तित्वच नाहीसे झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे़. एक महिन्यापूर्वी गंगाखेड रस्त्याच्या दुरवस्थेला कंटाळून समाजसेवकांनी रस्त्याच्या दुरवस्थेची ओरड वाढत चालल्याने दोन दिवसांपूर्वी डागडुजीचे काम सुरू झाले आहे़. ते देखील काही ठिकाणी मर्यादित आहे़. त्यामुळे नागरीकातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच चारही बाजूने श्रीगोंद्यात प्रवेश केला की, गाड्याची मोठ्या प्रमाणात आदळ आपट सुरु होते. त्यामुळे आता खड्डेच सांगतात श्रीगोंदा तालुक्याची हद्द असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.