Breaking News

भिवंडीत वाहन अपघातात . १ महिला ठार, १ जखमी.

भिवंडी : भिवंडी शहर परिसरात दोन वेगवेगळ्या वाहन अपघातांत १ महिला ठार तर एक गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या. पहिल्या घटनेत धामणकर नाका कल्याण रोडवरील स्वस्तिक हॉटेलसमोर रस्ता ओलांडत असताना रमिलाबेन बाबुभाई चव्हाण (७४) या महिलेला रिक्षाचालकाने जोरदार धडक दिली. 


या धडकेत रमिलाबेन डिव्हायडरवर आदळल्याने डोक्याला जबर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत जोहरा इब्राहिम शेख (६६, रा. मुरबाड) ही महिला तीनबत्ती येथून मुलगी शबनम अन्सारी हिच्या सोबत रस्त्याने पायी जात असताना चालकाने आपल्या ताब्यातील वॅगनार कार निष्काळजीपणे पाठीमागे घेतल्याने जोहरा यांना धडक बसली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्ही वाहन अपघातांची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.