Breaking News

अल्प जागेत उपहारगृहाला परवानगी कशी ? - संजय निरुपम

मुंबई - कमला मिलमध्ये लहान जागा असतांना देखील येथे 96 उपहारगृहांना परवानगी दिलीच कशी असा जाब विचारत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे. काल रात्री या भागात लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.


या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले. कमला मिल कम्पाऊंड या परिसरात 96 रेस्तराँ आहेत. या उपहारगृहांचे फायर ऑडिटही झाले नव्हते. पब आ णि रेस्टॉरंट मालकांच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती ओढावल्याचेही त्यांनी ट्वीट केले आहे.