केजरीवाल 12 जानेवारी रोजी विदर्भात
नागपूर - आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 12 जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे भेट देणार आहेत. जिजा मातेच्या जयंती निमित्त त्यांचे माहेर असलेल्या सिंदखेड राजा येथे पक्षाला संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्ताने केजरीवाल विदर्भात येणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.
याबाबत पक्ष प्रवक्त्यांतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार राष्ट्रमाता जिजाबाई यांच्या जन्मोत्सवानिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी रोजी आम आदमी पार्टीने संकल्प सभा आयोजित केली आहे. या संकल्प सभेच्या माध्यमातून महाराष्ट्रात पक्षाची मोट बांधणे आणि कार्यविस्तार करणे यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री व पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल सिंदखेड राजा येथे येणार आहेत.
येत्या 12 जानेवारी रोजी जिजाबाईंची जयंती असून त्यानिमित्ताने केजरीवाल जिजाऊच्या जन्मस्थानाचे दर्शन घेतल्यानंतर सकाळी 11 वाजता महाराष्ट्र संकल्प सभेला संबोधित क रणार आहेत. यावेळी पक्षाचे असंख्य समर्थक, आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. याचवेळी महाराष्ट्रातील आपचे विस्तार आणि बांधणीवर ही मार्गदर्शन होणार आहे. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या महाराष्ट्रातील या पहिल्यावाहिल्या सभेसाठी येत असल्याने या सभेची जय्यत तयारी करण्यात कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागले आहेत.