मागणी 1882 क्विंटलची , पुरवठा केवळ 396 क्विंटल
सोलापूर - राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा खात्याने राज्यभरातील अंत्योदय प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा पुरवठा विभागाने शहर जिल्ह्यासाठी एक हजार 882 क्विंटलची मागणी नोंदवली. यापैकी पणन महासंघाकडून फक्त 396 क्विंटल तूरडाळ डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळाली. मात्र त्यानंतर अद्याप तूरडाळ आलीच नाही.
एकंदरीत तूरडाळ वाटपाच्या शुभारंभा पुरतीच तूरडाळ शासनाकडून उपलब्ध झाली असून, डिसेंबर महिना संपत आला तरी डिसेंबरसाठी मंजूर तूरडाळीची लाभार्थींना अद्याप प्रतीक्षाच आहे.जिल्ह्यात 55 हजार 160 अंत्योदय योजनेचे तर प्रधान्य कुटुंब योजनेचे एक लाख 45 हजार 574 लाभार्थी आहेत. लाख 734 कार्डधारक असून, प्रतिकार्ड एक किलो याप्रमाणे एक हजार क्विंटल तूरडाळीची मागणी शासनाकडे करण्यात आली. शहरासाठी 87 हजार 594 लाभार्थींसाठी 875 क्विंटल तूरडाळीची मागणी करण्यात आली आहे. यापैकी डिसें बरच्या पहिल्या आठवड्यात फक्त दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यासाठी 403 क्विंटल डाळ उपलब्ध झाली आहे.