Breaking News

नगरसेवक कुणाल पाटील यांना मारण्यासाठी 1 कोटींची सुपारी

डोंबिवली, दि. 20, डिसेंबर - डोंबिवलीतील भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना मारण्यासाठी एक कोटी रुपयांची सुपारी घेतल्याची कबुली एका आरोपीने दिली आहे. 


या आरोपीस दरोड्याप्रकरणी पकडण्यात आले आहे. आरोपीसह एकूण 6 जणांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने सशस्त्र दरोडा प्रकरणात अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडून 1 पिस्तूल, 1 रिव्हॉल्व्हर, 2 गावठी कट्टे, 16 जिवंत काडतुसे यासह 3 लाख 40 हजार रुपये रोख रक्कम एवढा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

कुणाल पाटील यांना मारण्यासाठी आपल्याला एक कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असून त्यापैकी 11 लाख रुपये आधीच घेतल्याची कबुली आरोपीने दिली. डोंबिवलीमधील भाजपच्याच एका नगरसेवकाने आपल्याला ही सुपारी दिल्याचे त्याने आपल्या जबाबात म्हटले आहे.