Breaking News

एकतर्फी प्रेम व छेडछाडीला कंटाळून जालन्यात विद्यार्थीनीची आत्महत्या

जालना, दि. 12, डिसेंबर - घनसावंगीमधील (जि. जालना) राणीउचेंगाव गावात होणा-या छेडछाडीच्या प्रकाराला कंटाळून दहावीत शिकणा-या एका विद्यार्थीनीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी मनोहर आमले विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे.


गेल्या काही दिवसांपासून शाळेतून जाता येता आरोपीकडून प्रेम कर, असे म्हणत सतत त्रास दिला जात होता. या एकतर्फी प्रेमातूनच होणा-या छेडछाडीला कंटाळून मुलीने आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलल्याचे मुलीच्या पालकांनी म्हटले आहे.आरोपी आमले याने एकतर्फी प्रेमातून तिची छेड काढणे, त्याबरोबरच काही दिवसांपूर्वी प्रेम न केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे समोर येत आहे.