Breaking News

दुधनी जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात 28 जण ताब्यात

सोलापूर, दि. 12, डिसेंबर - पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून विशेष पोलीस पथकाने अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे हद्दीत जुगार अड्ड्यावर कारवाई करून सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करून 28 जणांना ताब्यात घेतले. 


अक्कलाकोट तालुक्यातील दुधनी रेल्वे स्थानक रोडलगत असलेल्या शानाप्पा देवेंद्रप्पा हौदे यांच्या घराच्या पाठीमागे चालणार्‍या मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून प्रल्हाद पंढरीनाथ गायकवाड, इराणा सोमन्ना फुलार, मेहबूब ताजोद्दीन शेखजी, यासिन रमजान गोडगाव, सय्यद सैफणसाब शिकलगारसह अन्य आरोपींना अटक केली आहेत. जुगार अड्ड्याचा मालक महेश लक्ष्मीपुत्र पाटील,अप्पू सैराना परमशेट्टी, बाबूसाब मेहबूबसाब बळोरगी, चंदप्पा भैरामडगी हे आहेत. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पोलिसांनी चार लाख 45 हजार 830 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अक्कलकोट द क्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.