Breaking News

बाळासाहेबांना सर्वाधिक त्रास उद्धव यांनीच दिला - नारायण राणे



लोकमंथन ऑनलाईन - बाळासाहेब ठाकरेंना त्रास दिल्याचे सांगत शिवसेनेने माझ्या विधान परिषद उमेदवारीला विरोध केला. पण साहेबांना सर्वाधिक त्रास उद्धव यांनीच दिला आहे. त्यांच्या कारस्थानी राजकारणामुळेच मी बाहेर पडलो. त्यांच्या सर्व कौटुंबिक भानगडी मला माहीत आहेत. त्यांनी तोंड बंद ठेवावे, अन्यथा भानगडी बाहेर काढू, असा इशारा देत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेची मला उमेदवारी दिली नाही; पण त्यांनी दिलेल्या शब्दावर माझा विश्वास आहे. येत्या पंधरा दिवसांत माझा राज्य मंत्रिमंडळात समावेश असेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. खा. शरद पवार यांनी सल्ला दिल्यामुळे मीही विधान परिषदेसाठी आग्रह केला नाही, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला. 

पेठनाका ता. वाळवा येथे वनश्री निवासस्थानी नारायण राणे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी माजी खा. निलेश राणे, आ. नीतेश राणे, वनश्री नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज  https://www.facebook.com/lokmanthannews लाईक आणि ट्विटर वर https://twitter.com/lokmanthannews फॉलो करा.