Breaking News

रामकृष्ण सेवा ट्रस्टच्या २०१८च्या दिनदर्शिकेचे माळीवाड्यातील विशाल गणपती मंदिरात प्रकाशन

नगर- प.पु.डोंगरे महाराजांच्या आशीर्वाद व प्रेरणेने सामजिक कार्यात अग्रेसर असलेल्या श्री.रामकृष्ण सेवा ट्रस्टने त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती समाजाला व्हावी,सेवा कार्यात लोकांचा सहभाग वाढावा , युवकांना प्रेरणा मिळावी या हेतूने सन २०१८ ची दिनदर्शिका काढण्यात आली.या दिनदर्शिकेची पहिली प्रत शहरातील ग्रामदेवत विशाल गणपतीच्या चरणी अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.


यावेळी श्री.रामकृष्ण सेवा ट्रस्टचे श्री.बाळासाहेब गांधी,श्री.नंदलाल मनियार,श्री.मोहनलाल मानधना,सुरेश चांडक, श्री.मगन पटेल,श्री.पुरुषोत्तम पटेल,श्री.अमृत शहा,श्री.रामेश्वर बिहाणी,श्री हिरालाल पटेल, जीवराज पटेल , हर्षल शहा,सोमनाथ नजान,विशाल पटेल,चीराग शहा,गोविंद मिनियार,श्री.पुरुषोत्तम नावंदर,श्री.सुमित चांडक,श्री.नितीन मंत्री,हर्षा गुजराथी,सौ.मंजु झालानी,सौ . संतोष खंडेलवाल,विजय पंजाबी,श्री.मनिष शहा उपस्थित होते.

आतिशय सुंदर व आकर्षक अशा या दिनदर्शिकेत श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट च्या कार्याची सखोल माहिती छायाचित्रासह देण्यात आली आहे. ट्रस्टचे ५०० आजीवन सभासद आहेत. आर्थिक शेक्षणिक व आरोग्य या तीन मुख्य गरजा लक्षात घेऊन ट्रस्टने श्री.रामकृष्ण अर्बन क्रेडीट सोसायटी,श्री.रामकृष्ण एज्युकेशन फौंडेशन व श्री.रामकृष्ण मेडिकल फौंडेशन तर्फे सर्वसामान्याच्या गरजा पूर्ण करण्यावर भर दिला आहे.महाराष्ट्र भक्त सेवा ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमाद्वारे परंपरा व संस्कृती जोपासणारे उपक्रमही राबविण्यात आले आहेत ट्रस्टचा उद्देश ,हेतू सर्वा पर्यंत पोहचावा व घराघरात माहिती असावी यासाठी दिनदर्शिका हे सर्वात उत्तम माध्यम असून याद्वारे ट्रस्टच्या कार्याची सर्व माहिती लोकांना सतत उपलब्ध असेल.या उपक्रमासाठी प्रकल्प प्रमुख म्हणून कार्यकरनारे श्री.पुरुषोत्तम नावंदर , श्री.सुमित चांडक यांचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आले.