Breaking News

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत नगरच्या तन्वी आवटे ने पटकाविला सुवर्ण पदक

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र कराटे स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने नुकतेच मुंबई येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत नगरच्या तन्वी अनुप आवटे हीने 10 वर्षा आतील गटात सुवर्ण पदक पटकाविले. या स्पर्धेत 10 वर्षा आतील गटात राज्यातील 40 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. तन्वीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत यश संपादन केले. 


तन्वी ही गुलमोहर रोड, आनंद विद्यालय येथे कराटे प्रशिक्षण घेत आहे. तीला प्रशिक्षक अमोल काजळे, दिनेश गवळी, शुभम जोशी, जयसिंग काळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ती माऊट लिटेरा झी स्कुलची विद्यार्थिनी असून, ती इयत्ता पाचवीत शिकत आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तन्वीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.