Breaking News

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने अहमदनगर कारागृहातील बंद्यांसाठी सतरंजी व फाईलचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने अहमदनगर कारागृहातील बंद्यांसाठी सतरंजी व फाईलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोतवालीचे पो.नि. अभय परमार, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.माणिक विधाते तर यावेळी सुरेश बनसोडे, कारागृहाचे प्र.अधिक्षक शामकांत शेडगे, यशस्विनीच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील, अज्जू शेख, संजय मंडलिक, अशोक झोटींग, विनोद साळवे, संदिप पवार, शैलेश राजगुरु, तानाजी धोत्रे, करण गारदे आदि उपस्थित होते.

प्रास्ताविकात रेखा जरे म्हणाल्या की, बंद्यांसाठी जेल हे सुधारगृह आहे. आपल्या वर्तनात व अंतर्मनात बदल करुन, पुन्हा नव्याने जीवन व्यतीत करण्याची संधी प्राप्त होत असते. सामाजिक बांधिलकीने कारागृहात हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रा.माणिक विधाते यांनी काही गुन्हे भावनेच्या भरात तर मजबुरीने घडून जातात. मात्र ते घडल्यानंतर मनुष्याला पश्‍चताप होतो. त्यांना देखील सुधरण्याची संधी कारागृहात मिळत असते. शिक्षा संपल्यानंतर त्यांनी चांगले नागरिक म्हणून जीवन व्यतीत करण्याचा सल्ला दिला.
पो.नि. अभय परमार म्हणाले की, वाईट सवयी व संगत महागात पडते. एखाद्या कुटुंबातील कर्ता पुरुषास कारागृहात जाण्याची वेळ आल्यास त्या कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.