Breaking News

सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी सेवा तीन दिवस बंद


सिंधुदुर्ग, दि. 30, डिसेंबर - मालवण बंदर जेटीची लांबी वाढवण्याची वारंवार मागणी करूनही मेरी टाइम बोर्डाने अजुन कार्यवाही केलेली नाहीं. त्यामुळे 29, 30 आणि 31 डिसेम्बर या तीन दिवशी प्रवासी होडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वेल्फेअर असोसिएशनने घेतला आहे. सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वेल्फेअर असोसियेशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यानी मालवण बंदर जेटी इथ आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यामुळे ऐन सुट्टीच्या कालावधीत पर्यटकाना सिंधुदुर्ग किल्ल्याच दुरूनच दर्शन घ्यावे लागणार आहे.