नाशिकच्या मुंबई नाका परिसरात खासगी बस पेटली; प्रवासी सुखरूप
नाशिक, दि. 11, डिसेंबर - मुंबई नाका परिसरात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका खासगी कंपनीच्या बसने अचानक पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली होती. ही बस नाशिकहून मुंबईकडे प्रवासी घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
रस्त्याच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार घडल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला होता. वेळीच सर्व प्रवाशांना खाली उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीची माहिती मिळताच परिसरातील अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी मदत केली. अचानक उडालेल्या गोंधळामुळे परिसरात काहीशी वाहतूक कोंडी झाली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.