Breaking News

युवकांसाठी स्वच्छतामित्र वक्तृत्व स्पर्धा

सांगली, दि. 30, डिसेंबर - स्वच्छ भारत अभियानातअंर्तर्गत सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने महाविद्यालयीन युवकांसाठी ’स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक‘ या स्पर्धेचे आयोजन क रण्यात आले आहे. ही माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) दीपाली पाटील यांनी दिली.

युवा शक्तीला पाणीपुरवठा व स्वच्छता या विषयात सहभागी करून घेता यावे व त्यांच्यातील वक्तृत्व गुणांना चालना मिळावी, या हेतूने स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालयीन व वरिष्ठ महाविद्यालयीन अशा दोन गटात तालुका, जिल्हा व राज्य अशा तीन स्तरावर घेतल्या जातील. 


तालुकास्तरिय वक्तृत्व स्पर्धा दि. 3 जानेवारी 2018 रोजी संबंधित पंचायत समितीच्यावतीने घेतली जाईल. तालुकास्तरावर दोन्ही गटासाठी प्रथम तीन विजेत्यास अनुक्रमे पाच हजार, तीन हजार व दोन हजार रूपये रोख पारितोषिक दिले जाईल. जिल्हास्तरावरील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 11 हजार, सात हजार व पाच हजार रूपयासह प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह, तर राज्यस्तरावरील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 51 हजार, 31 हजार व 21 हजार रूपये पारितोषिक दिले जाईल.