Breaking News

डोकलाम प्रकरणी चीनची नवी खेळी

नवी दिल्ली :  भारत, भुतान आणि चीनच्या सीमेवरच्या डोकलाममध्ये पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.  डोकलाममध्ये 1600 ते 1800 चिनी सैनिक मुक्कामी असल्याचं वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्रानं दिलं. डोकलाममध्ये ज्या ठिकाणी संघर्ष झाला होता, तिथे हे सैनिक नाही आहेत. तिथून काही मीटर अंतरावर हे सैनिक आहेत. पण भारताला ही चिथावणी आहे, यात वाद नाही. 


याआधी चिनी सैनिक गस्तीसाठी रोज डोकलामला यायचे आणि निघून जायचे.  1600-1800 चिनी सैनिकांचा मुक्काम  आहे. पण कोणत्याही प्रकारचं आव्हान सरकारनं दिलेलं नाही. चीननं देखील 2 हेलिपॅड्स बांधले  आहेत. चीनकडून रस्त्यांची डागडुजी सुरू आहे. आधीचा रस्ता 10 किमीनं वाढवण्यात आला आहे.   भारताकडून अजून कुठलीही  प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.