Breaking News

४२ चिनी अॅप देशासाठी धोकादायक


संरक्षण मंत्रालयाने आपल्या अधिकाऱ्यांना चीनने तयार केलेल्या सुमारे ४२ अॅपपासून चार हात लांब राहण्याचा सल्ला दिलाय. या अॅपच्या माध्यमातून चीन हेरगिरी करत असल्याचा भारतीय संरक्षण मंत्रालयाला संशय आहे.
ही सर्व अॅप देशवासीयांनी आपापल्या मोबाईल आणि डेस्कटॉप वरुन तातडीने हटवावी अश्या सूचना संरक्षण मंत्रालयाने दिल्या आहेत. 

संरक्षण मंत्रालयाने एकूण 42 अॅपला नोटीस बजावली आहे. यामध्ये WeChat, Weibo, ShareiT, Truecaller, UC News, UC Browser यांचा समावेश आहे. यासोबतच Mi Store, Mi Community, Mi Video call-Xiaomi हे सुद्धा आहे. भारतात सर्वात जास्त वी चॅट, शेअर इट, ट्रू कॉलर, यूसी न्यूज, यूसू ब्राऊजर, मी स्टोअर, मी कम्युनिटी, मी व्हिडिओ कॉल वापरले जातात. तसंच चीता क्लीन मास्टर सुद्धा माहिती चोरत असल्याचा संशय आहे.